पुण्याहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे इमरजन्सी लॅण्डींग

पुणे विमानतळावर एअर इंडियाचे विमान पुश बॅग डगला धडकल्याची बातमी ताजी असतानाच शनिवारी आणखी एक बातमी समोर आली आहे. पुण्याहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाच्या इंजिनमध्ये अचानक आग लागून शनिवारी संध्याकाळी विमानाचे आपत्कालीन लॅण्डिंग करण्यात आले. या घटनेमुळे 6 क्रू मेंबर्ससह प्रवासी तेरा तास कर्नाटकात अडकल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

18 मे 2024 रोजी बंगळुरू ते कोचीला जाणाऱ्या IX 1132 या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने बीएलआर विमानतळावर 2312 वाजता आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्याचे एका निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाचे प्रवक्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीवरुन, कर्मचाऱ्यांचे सुखरुपणे उतरविण्यात आले आहे. नेमकी ही आग कशी लागली याबाबत चौकशी केली जाईल. तर बंगळुरुच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमानाने टेकऑफ घेतल्यानंतर काही मिनीटात अचानक इंजिनमधून आग लागल्याचे लक्षात येताच क्रू मेंबर्सनी एअर ट्राफिक कंट्रोलरला अलर्ट केले विमान तत्काळ पुन्हा बंगळुरुला वळविण्यात आले आणि लॅण्डिंग केल्यानंतर तत्काळ प्रवाशांना सुखरुप उतरविण्यात आले. त्यानंतर आग विझविण्यात आली. त्यामुळे झालेल्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करत प्रवाशांना शक्य तेवढ्या लवकर सुखरुप उतरविण्यात आल्याने प्रवक्त्यांनी सांगितले.

एअरलाइनने रविवारी सकाळी 11.20 वाजता पर्यायी विमान उपलब्ध करुन दिले, ज्यामुळे सर्व प्रवाशी शेवटी 12:10 वाजता कोचीला पोहोचले.