बिलोलीत व्यापाऱ्याच्या किराणा दुकानाला, घराला आग; 70 लाखांचे नुकसान

511

बिलोली येथील प्रसिध्द व्यापारी तथा कृषी उतपन्न बाजार समितीचे संचालक साईनाथ आरगुलवार यांच्या नारायण किराणा दुकान व घराला सोमवारी मध्यरात्री शॉटसर्कीटमुळे आग लागली. आगीत तब्बल 70 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बिलोली शहारातील प्रसिध्द किराणा व्यापारी साईनाथ आरगुलवार यांच्या नारायण किराणा दुकानत सोमवारी मध्यरात्री अचानक शॉटसर्कीटमुळे दुकानाला आग लागली. दुकाना पाठोपाठ घराला लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केले. दुकानातील आग गोदाम तसेच घराच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली होती. घर दुकान गोदाम एकत्र असल्याने सर्वच जळुन खाक झाले. घरातील साहित्य सामान यांचा कोळसा झाला. घरांच्या भिंती स्लॅप यांना भेगा पडल्या. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबड़गे व पोलीस प्रशासनाने धाव घेतली. धर्माबाद येथील अग्नीशमन दलाचे वाहन खराब असल्यामुळे शेवटी मुखेड येथील अग्नीशमन दलाला पाचरण करण्यात आले. मुखेड येथील अग्नीशमनचा वाहन येइपर्यत दुकान व घर पूर्ण भस्म झाले होते. आग विझवायला तब्बल सहा तास लागले.

आपली प्रतिक्रिया द्या