नाशिक : भीषण आगीत चार झोपडय़ा भस्मसात

487
प्रातिनिधिक फोटो

नाशिकच्या फुलेनगर पाटाजवळील गौडवाडी येथे रविवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत चार झोपडय़ा जळून खाक झाल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही, सुमारे अडीच लाखांचे संसारोपयोगी साहित्य जळाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

गौडवाडी परिसरातील आपल्या झोपडीला आग लागल्याची माहिती रविवारी दुपारी साडेबारा वाजता रवी जाधव यांनी अग्निशमन विभागाला दिली. पंचवटी अग्निशमन केंद्राचे उपअधिकारी जे. एस. आहिरे, लीडिंग फायरमन एस. जे. कानडे, फायरमन नितीन म्हस्के, संजय माळी, सिद्धार्थ भालेराव, संजय कानडे, वाहन चालक डी. के. पवार एका बंबासह घटनास्थळी रवाना झाले. सुमारे अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात आली. मात्र तोपर्यंत जाधव यांच्या झोपडीसह शेजारील पप्पू इस्माईल, गफूर शरीफ सय्यद व शब्बीर बादशहा सय्यद यांच्याही झोपडया संपूर्ण जळाल्या होत्या. यात संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले.

आपली प्रतिक्रिया द्या