परभणीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

परभणी शहरातील नेहरु रोडवरील इंदिरा गांधी स्टेडियम सभोवतलच्या दुकान नंबर 13 मधील बंद असलेल्या ठिबक सिंचनाचे साहित्य (स्टॉक) असलेल्या कोल्हे ट्रेडिंग या दुकानातून दुपारी अचानक धुराचे लोट बाहेर येवू लागले.दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीटमुळे भीषण आग लागून संपूर्ण दुकान भस्मसात झाले. त्यामुळे त्यालगत असलेल्या दुकानातील कामगारांनी सदरील दुकानाचे शटर उघडून साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु पाहता पाहता आगीचे लोट वाढत असल्याने त्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. काही क्षणातच आगीने रौद्र्यरुप धारणकरुण धुराचे लोट बाहेर पडू लागले.

आग लागल्यानंतर 15 ते 20 मिनीटांनी महानगरपालिकेची अग्निशमन दलाचा एक बंब चार कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य व फर्निचर आगीत भस्म झाले होते. अग्निशमन दलाच्या सर्व कर्मचार्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत सर्व दुकान जळून खाक झाले होते. या आगीचे रौद्र्यरुप पाहून बाजुच्या सर्व दुकानादारांनी सुरक्षीतेचा उपाय म्हणून आपली दुकाने बंद केली व वाहनधारांनी देखील दुकानासमोर असलेली वाहने सुरक्षीतस्थळी हलविली. सुमारे तासभर आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच होते. परंतु कोणीही आग विझविण्यासाठी पुढाकार घेण्यास तयार नव्हते. यापासून दुर्घटना होऊ नये म्हणून बाजुला असलेल्या बालाजी हॉटेल मालकाने देखील हॉटेल मधील गॅस सिलेंटर सुरक्षीतस्थळी हलविले.