
दिल्लीत यंदा फटाके खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आता आसाममध्येही फटाके खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आसाम राज्याच्या प्रदूषण नियंत्र मंडळाने हा निर्णय जारी केला आहे. या निर्णयाचे उल्लंघन केल्यास प्रशासनाने पोलिसांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
बेकायदेशीररित्या फटाके खरेदी विक्री करणार्यांवर पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात फक्त पर्यावरणपूरक फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. राज्यात दर दिवशी झालेल्या कारवाईची माहिती देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. दिवाळीच्या दिवशी दोन तासांसाठी फटकाचे फोडण्याची मुभा देण्यात आली आहे.




























































