
तामिळनाडूहून अयोध्येकडे जाणारा फटाक्यांनी भरलेला एक ट्रक 16 जानेवारीच्या रात्री जळून खाक झाला.
उन्नावच्या पूर्वा कोतवाली भागातील खर्गी खेडा गावात ही घटना घडली. जळत्या वाहनातून फटाके आकाशात जात असताना प्रखर ज्वाळाही दिसत होत्या. व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. तब्बल तीन तास आग धगधगत होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.
22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या भव्य अभिषेक सोहळ्यासाठी हा ट्रक फटाके नेत असल्याचे सांगितले जात होते. मात्र या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आगीचे कारण अद्याप अज्ञात आहे आणि अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असल्याने अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.


























































