पहिला सर्जिकल स्ट्राईक

1045

>> दिग्पाल लांजेकर

‘फर्जंद’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक अभिनेते दिग्पाल लांजेकर आता एक नवा ऐतिहासीक विषय घेऊन येत आहेत. ‘फत्ते शिकस्त’ या आगामी सिनेमात दिग्दर्शनाबरोबरच सर्जेराव येथे या पराक्रमी वीराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

इतिहासाची आवड लहानपणापासूनच. माझे आजोबा आणि इतिहासकार निनाद बेडेकर हे दोघे एकमेकांचे मित्र होते. पूर्वी निनादकाका आजोबांकडे यायचे. त्यांच्याबरोबर राहून फिरणं, हळूहळू त्यांच्या ग्रूपमधून किल्ल्यांकर जाऊ लागलो. मोठा होत गेलो तसतशी इतिहासाची आवड वाढतच गेली. मग वाचन वाढलं. मग वेगवेगळय़ा संस्थांच्या माध्यमातून काम करत राहिलो. त्यामुळे इतिहासाची रूची अबाधित राहिली. शिवाजी महाराज हे आपलं दैवत आणि त्यांचं चरित्र हे चमत्कारिक घटनांनी भरलेलं आहे. तरुणांना मोह घालणारे आहे. त्यामुळे किशोरवयातच महाराजांच्या इतिहासाकडे ओढला गेलो. चांगली गोष्ट अशी की, मी इतिहासाचा अभ्यास निनादकाकांच्या हाताखाली केला. शिवाजी किंवा मराठा अशा इतिहासापुरताच त्यांचा संबंध नव्हता.

जागतिक इतिहासाचा पण त्यांचा तेवढाच अभ्यास होता. त्यामुळे ते तौलनिक पद्धतीने शिकवायचे. त्या पद्धतीने विचार करायची सवय लागली. त्यामुळे आगामी ‘फत्ते शिकस्त’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रॅक्टिकल शिवाजी महाराज मांडायचा प्रयत्न करतोय. खूप अद्वितीय गोष्टी शिवाजी महाराजांच्या काळात घडल्या किंवा आपल्या इतरही इतिहासात घडल्या. स्ट्रटेजिकल मूव्हज्, कन्स्ट्रक्टटिव्ह कामं असतील. दुर्दैवाने आपल्याकडे इतिहास म्हटला की, लढाई यांचीच उदाहरणं पाहतो; पण आपल्याकडे स्थापत्त्य आहे, शेतीचा विचार आहे,  पुराणकालीन बांधलेले कालवे दिसतात, म्हणजे अगदीच बोलायचे झाले तर पुण्याच्या कात्रजच्या तलावापासून शनिवारवाड्यात आणलेले पाणी असेल जे भुयारमध्ये काही तरुणांनी शोधून काढलं. अफाट आर्किटेक्चर आहे. त्या दाबाचा आणि भूगोलाचा विचार करून शनिवारवाड्यात असलेल्या हजारी कारंजे ही पण गमतीशीर गोष्ट आहे की, आपले पूर्वज किती वेगवेगळ्या पद्धतीने काम करत होते आणि आपल्यापेक्षा किती प्रगत होते. त्यामुळे वारंवार मला इतिहास खुणावतोय.

हिंदुस्थानातला पहिला सर्जिकल स्ट्राइक
छत्रपती शिकाजी महाराजांनी शाहिस्तेखानाकर जो लाल महालात छापा घातला त्याकर ‘फत्ते शिकस्त’ हा सिनेमा आधारलेला आहे. थोडक्यात, हिंदुस्थानातला हा पहिला सर्जिकल स्ट्राइक आहे असंच म्हणतो. ‘सर्जिकल स्ट्राइक’ हा शब्द वापरतो; कारण या शब्दाला ग्लॅमर आहे म्हणून नव्हे, तर मी या घटनेचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला असं जाणवलं की, आज असा हल्ला चढवताना जवानांनी ज्या गोष्टी अवलंबिल्या त्या सगळ्याचं मूळ मला शिवाजी महाराजांच्या त्या मिशनमध्ये दिसलं. हे मिशन अवघड अशासाठी होतं; कारण त्याकाळी आजच्यासारखी कुठलीही उपकरणं नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं. त्यामुळे हे मिशन तेव्हा माणसांच्या एकूण कर्तबगारीवर, विश्वासावर आणि त्यांनी मिळवलेल्या अचूक माहितीच्या देवाणघेवाणीवर अकलंबून होतं. यावरून महाराजांचं गुप्तहेर खातं किती सक्षम होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने ही स्ट्रटेजी आखली हे कळतं. म्हणजे शाहिस्तेखानाची तीन बोटे तुटली एकढंच आपल्याला माहीत आहे इतिहासातून… पण ती तोडण्यासाठी महाराजांचं सहा-सात महिने काम चालू होतं. महाराजांच्या एकूण स्ट्रटेजीचं दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे.

सर्जेराव जेधे शिवकालातलं आवडतं पात्र
‘फत्ते शिकस्त’ या चित्रपटात मी बाजी सर्जेराव जेधे ही व्यक्तिरेखा साकारली आहे. हे शिककालातलं माझं स्वतःचं अत्यंत आवडतं पात्र आहे. शिवाजी महाराजांचा हा लहानपणापासूनचा सवंगडी होता. कान्होजी जेध्यांचा हा सर्वात थोरला मुलगा. प्रतापगडाच्या लढाईत शेकडो गनिमांमधून भगवा झेंडा त्यांनी वाचवून आणला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना सर्जेराव असा किताब दिला होता. त्यामुळे बाजी सर्जेराव जेधे असंच त्यांना म्हटलं जातं. एक उमदा पराक्रमी वीर असं माझ्या या पात्राचं वर्णन करता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या