आधी लोकसभेची निवडणूक, मग तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक; अजित पवारांचं मोठं विधान

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कर्जत येथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठं विधान केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. आजही अजित पवार भाषण करत असताना तशा घोषणा देण्यात आल्या.

यानंतर अजित पवार यांनी भाषणात स्पष्ट केलं की, ‘इथले तरुण वेगवेगळ्या घोषणा देत होते. पण पहिले लोकसभेची निवडणूक आहे. नंतर तुमच्या मनात जे आहे ती निवडणूक होणार आहे. लोकांच्या मनात काय आहे हे आम्ही लोकं इथे आहोत’.

अजित पवारांच्या या विधानाचे वेगवेगळ अर्थ राजकीय वर्तुळात काढले जात आहे.