नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ अडकली लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बंगाली अभिनेत्री व तृणमूल काँग्रेसची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहाँ ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. नुसरतने तिचा बॉयफ्रेंड निखिल जैन याच्यासोबत तुर्की येथे लग्नगाठ बांधली. या सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिने चाहत्यांना तिच्या लग्नाची माहिती दिली.

नुसरतने तुर्कीतील बोद्रुम शहरातील एका पंचतारांकित रिसॉर्टवर शाही सोहळ्यात सात फेरे घेतले. या सोहळ्याला तिचे जवळचे नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते. नुसरतने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यासाची मुखर्जी याने डिझाईन केलेला लेहेंगा घातला होता. नुसरत व निखिल यांचा रिसेप्शन सोहळा 4 जुलैला कोलकाता येथे होणार आहे.

तृणमूल काँग्रेसची खासदार असलेली नुसरत जहाँ ही बसिऱ्हत मतदारसंघातून तब्बल साडे तीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आली होती. नुसरतने काँग्रेसच्या खासदाराचा पराभव केला होता.