मराठवाडय़ाचा मुक्तिसंग्राम मोठय़ा पडद्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई चित्रपट महोत्सवात मराठवाडय़ाचा मुक्तिसंग्राम या माहितीपटाचे खास स्क्रीनिंग 13 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सिटीलाइट सिनेमा येथे होणार आहे. यानिमित्ताने मराठवाडय़ाचा मुक्तिसंग्राम प्रथमच मोठय़ा पडद्यावर झळकणार आहे.

निझामाच्या क्रूर रझाकारांपासून मराठवाडय़ाच्या मुक्तीसाठी लढा देणाऱया शूरवीर स्वातंत्र्ययोद्धय़ांच्या धगधगत्या संघर्षाबरोबरच मराठवाडय़ाच्या मातीचा झळाळता गौरवास्पद इतिहास या नाटय़ माहितीपटात मांडण्यात आला आहे. ‘मुक्तिसंग्रामः कथा मराठवाडय़ाच्या संघर्षाची’ हा सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची निर्मिती आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे. अजय पुरकर, समीर धर्माधिकारी, आदिनाथ कोठारे, समीर विद्वांस, विक्रम गायकवाड, स्मिता शेवाळे आहेत.