
चीनमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेने डॉक्टरही चक्रावले आहेत. दक्षिण चीनच्या गुआंगडोंग प्रांतात एकजण पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. मात्र, त्याच्या पोटदुखीचे निदान होत नसल्याने डॉक्टरांनी त्याला एक्स रे काढण्यास सांगितला. एक्स रे बघून डॉक्टरही चक्रावले. त्यात त्याच्या मलाशयात सुमारे 16 इंच लांबीचा मासा असल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी यााबाबत रुग्णाला विचारले असता काही दिवसांपूर्वी आपण नकळतपणे माशावर बसलो होतो, असे त्याने सांगितले. नकळतपणे माशावर बसल्याने तो मासा त्याच्या मलाशयात शिरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून मासा बाहेर काढण्यात आला आहे.
नकळतपणे कुठेही बसण्याची सवय चीनमधील एका व्यक्तीला महागात पडली आहे. तो नकळतपणे एका माशावर बसला आणि मासा त्याच्या मलाशयात शिरला. त्यामुळे व्यक्तीवर शस्त्रक्रिया करावी लागली, असे डॉक्टरांनी सांगितले. मागच्या मंगळवारी एक रुग्ण पोटदुखीची तक्रार घेऊन आला होता. त्याचा एक्स रे काढल्यावर त्याच्या मलाशयात 16 इंचाचा मासा अडकल्याचे दिसले. त्यामुळे त्याला पोटदुखीचा त्रास असल्याचे निदान करण्यात आले. एवढ्या मोठ्या लांबीचा मासा काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली. या श्स्त्रक्रियेचा व्हिडिओ चीनमध्ये सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्यात डॉक्टर या व्यक्तीच्या मलाशयातून 16 इंचाचा मासा काढताना दिसत आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती सुधारत असून लवकरच त्याला घरी सोडण्यात येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने बसताना काळजी घ्यावी, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.