
तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील जलशुद्धीकरण पेंद्राची शुद्ध पाणी वाहून नेणारी जलवाहिनी कोतवली गावाजवळ फुटल्याने वाशिष्ठाr नदीपात्रातील मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांतून येणारे दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर नदीत सोडले जाते. मात्र, दीपावलीच्या सुट्टीचा गैरफायदा घेत काही कारखान्यांकडून अप्रक्रियायुक्त दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याचा आरोप होत आहे. या घटनेनंतर एमआयडीसीचे ठेकेदार, डेप्युटी इंजिनीअर आर. जी. पुळकर्णी यांच्या उपस्थितीत 27 ऑक्टोबर रोजी कोतवली ग्रामपंचायत कार्यालयात एक संयुक्त बैठक आयोजित केली आहे.



























































