
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
गुहागर तालुक्यातील बोऱ्या समुद्रकिनारी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाच्या पथकाने पकडली. पर्ससीन नेट नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत असताना सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागाच्या पथकाने पकडली.
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागाच्या माऊली साई यानौकेतून गस्त घालत असताना गुहागर येथे रात्री एक वाजता मिरकरवाडा येथील उम्मे आयमान ही पर्ससीन नेट नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत होती. या नौकेवर महाराष्ट्र सागरी अधिनियम 1981 अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी आ.बा.साळुंखे, विकास अधिकारी वि.बा. कांबळे, परवाना अधिकारी संतोष देसाई, हर्णे येथील महेंद्र चोगले आणि इतर 14 सदस्यांच्या उपस्थित ही कारवाई करण्यात आली.


























































