पर्ससीन मासेमारी सुरू स्थानिक मच्छीमारांची मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार

गुरूवारी सकाळी मालवण तालुक्यातील कुणकेश्वर किनारपट्टी जवळ सुमारे 50 ते 60 पर्ससीन नौका अवैध मासेमारी करत असल्याचे निदर्शनास आले. सदर बाब लक्षात येताच पारंपारिक मच्छीमार आणि रापण संघ प्रतिनिधींनी मत्स्यपरवाना अधिकाऱ्यांशी तसेच आयुक्तांशी संपर्क साधत तात्काळ कारवाईची मागणी केली. मात्र नौसेना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सर्व प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असल्याने, आवश्यक ती कारवाई न झाल्याने मच्छीमार वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

पर्ससीन नौकांवर आवश्यक कारवाई करण्याकरीता असलेल्या सागरीगस्ती नौका वेळी उपलब्ध न झाल्याने मच्छीमार वर्गात आधीच उदासीनता होती. त्यात मत्स्य परवाना अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात एकमेव कार्यरत असलेल्या गस्ती नौकेला पाचारण करण्यास महसूल प्रशासन, तहसीलदार व पोलिस प्रशासन यांनी चर्चा करून संयुक्त सागरी गस्तीसाठी लेखी पत्र देऊन मागणी केली असल्याचे कळविण्यात आले. यामध्ये सुमारे तीन ते चार तासांचा कालावधी उलटल्याने 1 डिसेंबर 2023 नंतर कोणत्याही क्षणी मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालय मालवण, समोर आमरण उपोषण तसेच वेळ पडल्याच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पारंपारिक मच्छीमार व रापण संघाने मत्स्य परवाना अधिकाऱ्यांना दिला आहे.