जाळ्यात सापडलेल्या दुर्मिळ समुद्री कासवाला मच्छिमारांनी दिले जीवदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवगड तालुक्यातील तारामुंबरी मिठमुंबरी खाडीपात्रामध्ये बेलवाडी समोर तारामुंबरी गावातील काही तरुण मच्छिमार परंपरागत होडीने मासेमारी करीत असताना त्यांच्या जाळ्यात ग्रीन टर्टल या जातीचे खोल समुद्रात असणारे सुमारे 250 किलो वजनाचे समुद्री कासव सापडले.

सदर जाळीतून कासव व्यवस्थितपणे सोडवून होडीत ठेवून त्याला तारामुंबरी येथील किनारी आणण्यात आले. त्यानंतर त्या कासवाला थ्री व्हीलर टेम्पोतुन मुख्य समुद्रात सोडण्यात आले. यात दीपक खवळे, अक्षय खवळे, गौरीश खवळे, ज्ञानेश्वर सारंग, पंकज दुधवडकर, या युवकांनी विशेष मेहनत दुपारी 1 ते सायं. 5 पर्यंत घेतली. त्यांचा वनविभागामार्फत प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे समजते. या वेळी प्रकल्प समनव्यक लवेश करंगुटकर, सहायक ऐश्वर्या पाटील उपस्थित होते.