फिटनेससाठी पौष्टिक खिचडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> खिचडीत आपण डाळ, तांदूळ आणि भाज्या वापरतो. त्यासोबतच त्यात तूपही असते. या तुपात भरपूर न्यूट्रिशन्स असतात. त्यामुळे कर्बोदके, प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन्स मिळतात.

> खिचडी सहज पचते. त्यामुळे बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन, गॅस वा पोट फुगण्यासारख्या समस्यांचा प्रश्नच येत नाही.

> खिचडीत चरबी आणि कॅलरीज खूपच कमी आढळतात. त्यामुळे ती पचते आणि अर्थातच त्यामुळे ती वजन वाढू देत नाही. वजन कमी करण्यासाठीही ती फायद्याचीच ठरते.

> अख्ख्या धान्याची खिचडी नियमित खाल्ल्यास शरीरातील इन्सुलिन नियंत्रणात राहते. त्यामुळे साहजिकच मधुमेहासारख्या विकारापासून बचाव होतो.

> खिचडी नियमित खाल्ल्यास वात, पित्त आणि कफापासून बचाव होतो. कारण खिचडी हा एक हलकाफुलका पदार्थ असतो.

> हेवी आणि जंक फूडपासून शरीरात तयार होणारे विषाक्त पदार्थ नियमित खिचडी खाल्ल्याने शरीरातून निघून जातात. शरीर डिटॉक्स होते.

> खिचडीमुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे शरीर डिटॉक्स झाल्याने त्वचा आरोग्यदायी आणि चमकदार होते.