
मुंबईत राहून मराठी भाषेची अवहेलना करणारा व्यापारी सुशील केडिया याच्या कार्यालयाची तोडपह्ड करण्यात आली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
मराठीद्वेष्टा असलेल्या केडियाची समाजमाध्यमांवर एक चित्रफीत पसरली होती. त्यात त्याने मुंबईत 30 वर्षे राहूनही तो मराठी बोलू शकत नाही. शिवाय त्याने जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना आव्हान देण्याची भाषा वापरली होती. त्यामुळे काही तरुणांनी वरळी येथील केडियाचे कार्यालय गाठून तोडपह्ड केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.