
लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 37 पैकी 5 स्वॅब पॉझिटीव्ह आढळून आले असून उर्वरित 32 निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
धाराशिव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज गुरुवारी 37 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविण्यात आले होते. या सर्व स्वॅबचा रिपोर्ट प्राप्त झाला असून 37 पैकी 32 स्वॅब निगेटिव्ह आले असून उर्वरित 5 स्वॅब हे पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी तीन रुग्ण तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथील असून ते पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. एक रुग्ण तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील असून तोही पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे तसेच नळदुर्ग येथे एक रुग्ण सापडला असून तो ही पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांचीसंख्या 165 झाली असून आतापर्यंत तब्बल 127 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या जिह्यातील विविध शासकीय रुग्णालयात 32 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने सहा जणांचा बळी घेतला आहे.






























































