रत्नागिरीत आढळले कोरोनाचे 5 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 161 वर

848

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 5 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. यापैकी चार गुहागर तर एक रत्नागिरी तालुक्यातील आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 161 वर पोहचली आहे.

आज एकूण 45 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 40 अहवाल निगेटिव्ह आले. 5 अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 161 वर पोहचली आहे. त्यापैकी 102 रूग्ण उपचार घेत आहेत. चौंघाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 55 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

रत्नागिरीत होणार कोरोना तपासणी प्रयोगशाळा  

रत्नागिरी जिल्ह्यातील स्वॅब तपासणीसाठी मिरजला पाठविण्यात येत होते. त्यांचा अहवाल येण्यास विलंब होत होता, त्यामुळे जिल्ह्यात कोरोना तपासणी प्रयोगशाळा व्हावी अशी मागणी पालकमंत्री ॲड.अनिल परब ,उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीनंतर रत्नागिरी जिल्ह्याला कोरोना तपासणी प्रयोगसाठी 1 कोटी 7 लाख 6 हजार 920 रूपये मंजूर झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या