निवडणूक भरारी पथकाकडून उरणमध्ये पाच लाखांची रोकड जप्त

509

निवडणूकीत पैशांचा होणारा गैरवापर टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथके आणि तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी सूरू केली आहे. एका तपासणीत उरण विधानसभा मतदार संघातील बोकडविरा येथून एका वाहनातून तब्बल पाच लाख रूपये रोकड जप्त करण्यात आली आहे. तपासणी दरम्यान रोकडबाबत संबंधितांनी योग्य खुलासा केला नसल्याने पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेतली आहे. ही रक्कम उरण नगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा पगार असल्याचे रक्कम घेवून जाणाऱ्या व्यक्तीने सांगितले. मात्र, याबाबतची खात्री पटल्यानंतर ती रक्कम परत केली जाईल, असे उरण पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या