झारखंडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात 5 पोलीस शहीद

11
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । जमशेदपूर

झारखंडमध्ये पुन्हा माओवादी-नक्षलवाद्यांनी रक्तरंजित हिंसाचार केला आहे. सरायकेला जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी बेछूट गोळीबार करीत हल्ला केला. त्यात पाच पोलीस शहीद झाले.

सरायकेला हे जमशेदपूरपासून 40 कि.मी.वर असून, झारखंड-पश्चिम बंगालसीमेवर आहे. कुकडू गावात आठवडा बाजारावेळी पोलीस पथक गस्तीवर होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यात पाच पोलीस शहीद झाले. यामध्ये दोन उपनिरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल आहेत. काही पोलीस जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर नक्षलवादी पळून गेले. पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या