
फोटोग्राफीचे नाव घेतले की आपल्यासमोर येतो DSLR कॅमेरा. मात्र अनेकदा जास्तीच्या किंमतीमुळे तो प्रत्येकालाच घेणे परवडेल असे नाही. मात्र बाजारात असे अनेक स्मार्टफोन आहेत ज्यांची फोटो क्वालिटी डीएसएलआरला टक्कर देईल अशी आहे. आज आपण अशाच 5 स्मार्टफोन आणि त्यांच्या फीचर्सबाबत माहिती घेणार आहोत.
1. POCO M2 Pro

या फोनमध्ये 4 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आले आहे.
– तसेच 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
– स्मार्टफोनला 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला असून 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
– 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 13,999 तर 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे.
2. Realme 6 Pro

या फोनमध्ये देखील 4 रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे.
– तसेच 16 मेगापिक्सल आणि 8 मेगापिक्सलचा ड्युअल फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.
– फोनला 6.60 इंचाची फुल HD+ डिस्प्ले आणि 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
– 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 आहे.
3. POCO X2

फोनला 4 रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
– सेल्फीसाठी 20 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.
– फोनला 6.67 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि 4,500 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
– 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499, 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 18,499 आणि 8GB रॅम व 128GB व्हेरिएंटची किंमत 21,499 रुपये आहे.
4. Motorola One Fusion Plus

फोनला 4 रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
– सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा
– फोनला 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि 5,000 mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
– 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 17,499 रुपये आहे.
5. Oppo A52

फोनला 4 रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 12 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलची मायक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
– सेल्फीसाठी 8 मेगापिक्सल फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे.
– फोनला 6.5 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि 5,000 mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे.
– हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज, व 8GB आणि 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून याची सुरुवातीची किंमत 16,990 रुपये आहे.


























































