काळमांडवी धबधब्यावर पाच तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

1001
sunk_drawn_death_dead_pic

पालघरपासूनजवळ असलेल्या जव्हारमधील काळमांडवी धबधब्यावर फिरायला गेलेल्या 13 तरुणांपैकी 5 जण बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. बुडालेल्या पाच जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असून चोघांचा शोध सुरू आहे. सेल्फी घेण्याच्या नादात ते बुडाल्याची माहिती मिळाली आहे.

जव्हारपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या काळमांडवी (केलीचपडा,काळशेती) धबधब्यावर फिरायला गेलेले पाच तरुण बुडाल्याची घटना घडली आहे. धबधब्यावर सेल्फी घेण्याच्या नादात ते बुडाल्याची माहिती मिळाली आहे. ते तरुण जव्हार येथील अंबिका चौकमधील आहेत. या धबधब्यावर 13 तरुण फिरायला गेले होते. सेल्फी घेण्याच्या नादात 5 तरुण बुडल्याची घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. हा धबधबा खूप मोठा आणि खोल आहे. या तरुणांना खोलीचा अंदाज न आल्यामुळे एकाच वेळी 5 जण बुडाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले आहेत. बचाव कार्यासाठी , एन.डी. आर.एफ. च्या टीमला पाचारण करण्यात आले असल्याची माहिती आमदार सुनील भुसारा यांनी दिली. जव्हारचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे हे  घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या