कोण करतंय खोडसाळपणा? फ्लॅटच्या दरवाजाची बाहेरून कडी लावून कोंडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

फ्लॅटच्या दरवाजाची कडी बाहेरून लावून खोडसाळपणा करत फ्लॅटमधील लोकांना कोंडून ठेवण्यात आले. हा प्रकार चिपळूण शहरात घडला असून याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चिपळूण शहरातील भोगाळे येथील ‘डॉन रेसिडन्सी’ या इमारतीत फ्लॅट क्रमांक एम-३ मध्ये राहणाऱ्या तानू काशीराम आंबेकर आणि कुटुंबीय राहतात. आंबेकर कुटुंबीय घरात झोपलेले असताना त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा अज्ञात इसमाने बाहेरून बंद केला. आतील लोकांना कोंडून ठेवण्याचा हा खोडसाळपणा केला. त्यानंतर इतर रहिवाशांनी कडी उघडून त्यांना बाहेर काढले. दरम्यान, या घटने तानू आंबेकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. भादंवि. कलम ३४२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.