वझिरा स्वयंभू देवस्थान ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना 45 लाखांचा निधी

981

राज्यातील पूरग्रस्तांसाठी वझिरा देवस्थान ट्रस्टतर्फे पूरग्रस्तांना 20 लाख रुपयांचा निधी देण्यात आला. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि बोरीवली येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थान विश्वस्त संस्थेचे सरचिटणीस विजय दारूवाले, अध्यक्ष नितीन पाटील, विश्वस्त विश्वास रावते, दिलीप पाटील, विश्वास केणी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 20 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. दरम्यान, या पूर्वी वझिरा श्री गणेश ग्रामस्थ सेवा मंडळाने पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिला आहे. अशाप्रकारे देवस्थानकडून 45 लाखांची मदत करण्यात आली आहे. यावेळी माजी उद्योग मंत्री आणि शिवसेना नेते लीलाधर डाके, आमदार विलास पोतनीस, सचिव मिलिंद नार्वेकर, महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या