
चंद्रपूर जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून पावसाने थैमान घातलेलं आहे. जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला. नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी येऊन संपूर्ण शेतीचे नुकसान झालं. दोन दिवसापासून पुराचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतातून उतरणं सुरू झालं आहे.
हिवरा गावातील शेतकरी रवींद्र चोथले यांची संपूर्ण शेती पुराच्या पाण्याने बुडालेली होती. दोन दिवसापासून शेतात आलेलं पुराचं पाणी उतरत असताना आज मात्र त्यांच्या शेत जमिनीवर काही विशिष्ट भागात उकडीचा उद्रेक होताना दिसत आहे. हे बघून एक वेगळच आश्चर्य निर्माण झालेल आहे. असं कधीच बघितलं नसल्यानं पहिल्यांदा झालेलं असल्यामुळे पूर उतरला पण काही विशिष्ट उद्रेक करून गेला अशी समज निर्माण झालेली आहे.


























































