
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या जलप्रलयातील बळींची संख्या 77 वर पोहोचली आहे. रविवारी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हद्वानी भागाचा दौरा केला. उत्तरकाशीच्या हर्षिलहून लमखागावरून हिमाचल प्रदेशच्या चितकुल परिसरात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 11 ट्रेकर्सपैकी 7 जणांचे मृतदेह रविवारी सापडले, तर इतर चारपैकी दोघे गंभीर जखमी अवस्थेत सापडले आणि दोघांचा शोध घेतला जात आहे. जलप्रलयात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफची पथके सक्रीय आहेत.


























































