मालाडमधील वाहतूककोंडी फुटणार, लगून रोड ते इन्फिनिटी मॉलदरम्यान होणार उड्डाणपूल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पश्चिम येथील लगून रोड ते इन्फिनिटी मॉलपर्यंत उड्डाणपूल बांधण्याला महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. त्यामुळे मालाड पश्चिम लिंक रोड विशेषतः मीठ चौकी परिसरातील वाहतूककोंडी फुटणार आहे. मुंबई महापालिका हा उड्डाणपूल बांधणार आहे.

मालाड पश्चिमेला लगून रोड ते इन्फिनिटी मॉलदरम्यान होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे या भागात उड्डाणपूल बांधण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रहिवाशांकडून केली जाते आहे. 380 मीटर लांबीचा आणि 36.06 मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार आहे. पुलामुळे लिंक रोड ते मालवणी परिसर थेट जोडला जाणार असल्याने लिंक रोडवरील वाहतुकीवरील ताण कमी होणार असून वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. लगून रोड ते इन्फिनिटी मॉलदरम्यान वाहतूककाsंडीमुळे साधारणपणे एक ते दोन तास लागतात, पण आता हे अंतर 15 मिनिटांत कापता येणार आहे.