
लिंबू लवकर खराब होऊ नये यासाठी योग्य प्रकारे साठवण करणे आवश्यक आहे. लिंबू लवकर सुकतात किंवा बुरशी लागून खराब होतात. लिंबू साधरणत ः रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास जास्त काळ टिकतात. पण, ते एका हवाबंद पिशवीत ठेवले तर आणखी जास्त टिकतात. यामुळे थंड हवेमुळे लिंबू लवकर सुकत नाही. शक्यतो लिंबू एकमेकांना लागून असलेले ठेवू नयेत.
लिंबू एखाद्या टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवावे. यामुळे अतिरिक्त आर्द्रता शोषली जाते आणि ओलावा संतुलित राहतो. याशिवाय कापडातही लिंबू गुंडाळून ठेवता येतात. एक पारंपरिक पद्धत म्हणजे, एका स्वच्छ कंटेनरमध्ये पाणी भरून त्यात लिंबू ठेवावे आणि ते फ्रीजमध्ये ठेवा. पाणी 3-4 दिवसांनी बदलत राहावे.





























































