
गाजर जास्त दिवस टिकवण्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक करा. सर्वात आधी गाजरावरील हिरवी पाने कापून टाका. कारण ती ओलावा शोषून घेतात आणि गाजर लवकर खराब करतात. गाजर फक्त वापरण्यापूर्वी धुवा. साठवण्यापूर्वी धुऊ नका. गाजर रेफ्रिजरेटरच्या क्रिस्पर ड्रॉवरमध्ये ठेवणे उत्तम आहे.
सफरचंद, केळी यांसारख्या फळांपासून गाजर दूर ठेवा. कारण त्यातून निघणाऱया वायूमुळे गाजर लवकर खराब होतात. गाजर जास्त कोरडेपणात ठेवू नका. त्यामुळे ते मऊ होतात. तसेच ते जास्त ओलाव्यातही ठेवू नका. त्यामुळे गाजर लवकर खराब होतात. गाजरांना स्वच्छ धुतल्यानंतरच खा.


























































