रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी महिलांनी खावे ‘हे’ पदार्थ

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महिलांनी खाली दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा, त्याने त्यांना नक्कीच फायदा होईल.

अंडी – अंड्यामधून शरीराला प्रोटिन्सचा पुरवठा होत असल्याने स्नायूंना बळकटी येते. अंड्यात व्हिटॅमिन डी असते. दररोज अंड खाल्ल्याने लोहाची कमतरता भासत नाही. रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. लठ्ठपणाचा त्रास होत नाहीत. चाळीशीनंतरच्या महिलांनी दररोज एक अंड खाणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.

गाजर – गाजरामध्ये जीवनसत्व ‘अ’ ची भरपूर मात्रा असते. दृष्टी चांगली ठेवण्यासाठी आणि त्वचा नितळ ठेवण्यासाठी गाजर उपयुक्त मदत करतं, दररोजच्या आहारात गाजराचा समावेश केल्यास त्वचेवरील डाग आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेची कांती उजळण्यास मदत होते.

सफरचंद – रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना दूर ठेवता येते असे म्हटले जाते. सफरचंदात प्रचंड ऊर्जा असते, सफरचंद किंवा त्याचा रस घेतल्यास प्रतिकारशक्ती वाढून सर्व विकार दूर होतात. त्याचा अशक्तपणा दूर होऊन ऊर्जा मिळते. सफरचंदामध्ये पोटॅशिअम आणि फॉस्फरस हे क्षार पुरेशा प्रमाणात असतात. अन्नातून पोटॅशिअम पुरेशा प्रमाणात ज्यांना मिळते अशा व्यक्तींना सहसा हृदयविकाराचा धोका कमी असतो.

दही – दही आरोग्यासाठी हितकारक मानले जाते. प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दही खाणे फायद्याचे आहे. त्यासाठी दररोज एक वाटी दही खावे. शक्यतो दही दुपारचे खावे. दही हा ऊर्जेने भरपूर असा पदार्थ आहे. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असे घटक असतात. त्यामुळे बऱ्याचदा डॉक्टर आहारामध्ये दह्याचा समावेश करण्यासाठी सांगतात.

शेंगदाणे – शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन-.ई, फॉलेट, नियासिन, मॅगनीझ आणि प्रोटीन अशा आवश्यक घटक असतात. शेंगदाण्यात जीवनसत्त्वे खनिजे, अँटी ऑक्सिडेंट आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असल्याने रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.

सब्जा – वजन कमी करण्यासाठी सब्जा अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरतो. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.

व्हिटॅमिन ‘सी’ असलेली फळं – आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ‘सी’ असलेली फळं जास्त खाणे. वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि त्वचा चमकदार ठेवण्यासाठीही व्हिटॅमिन सी महत्वाचे काम करते. हे व्हिटॅमिन शरीरामध्ये आयर्नचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतं. लिंबू, आवळा, संत्री आणि द्राक्षं यांसारखी आंबट फळं खाऊ शकता.

आपली प्रतिक्रिया द्या