पंढरपूरला यात्रेसाठी आलेल्या संगमेश्वर येथील वारकऱ्यांना विषबाधा

629

पंढरपूर येथे यात्रेनिमित्त संगमेश्वरमधून आलेल्या वारकऱ्यांना पंढरपूर येथे जेवणात विषबाधा होण्याचा प्रकार घडला आहे.  या वारकऱ्यांनी  जेवण केल्यानंतर त्यांना उलट्या सुरू झाल्या. त्यांना तातडीने पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामध्ये दोन मुले, दहा महिलांसह 31 जणांचा समावेश आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सर्वजण सुखरुप असल्याचे सांगण्यात आले. संगमेश्वर-चिपळूण मतदार संघाचे आमदार शेखर निकम  यांनीही या प्रकाराची दखल घेतली असून त्यांनी पंढरपूर येथे रुग्णालयात संपर्क साधून सर्वांच्या प्रकृतीची विचारपूस केली व उपचाराबाबत माहिती घेतली.

आपली प्रतिक्रिया द्या