Food Tips कारल्याचा कडूपणा घालवण्याच्या ट्रिक्स, पोषणमुल्यही कमी होणार नाहीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म आहे. कारले भलेही कडू असले तरी आपल्या आरोग्यासाठी वरदान आहे. मधुमेह असणाऱ्यांना तर कारले नियमीत सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र बऱ्याचदा कडूपणामुळे अनेक लोक याचा डाएटमध्ये समावेश करत नाहीत. तुम्हीही त्यापैकी एक असाल तर आज आपण काही घरगुती ट्रिक्स वापरून कारल्याचा कडूपणा कसा कमी करावा हे पाहूया…

1. कारल्याची भाजी करण्यापूर्वी त्याच्या सालीवर असणारा टोकदार भाग काढून टाका. यानंतर कापलेल्या कारल्यातून बिया बाहेर काढा, कारण कारल्याच्या बिया खूपच कडू असतात. यानंतर त्याची भाजी बनवा.

2. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी यावर मीठ लावा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. यानंतर कारले उकडून घ्या आणि मग त्याची भाजी बनवा.

3. कारल्याचे छोटे-छोटे तुकडे करा आणि दह्यामध्ये जवळपास एक तास हे तुकडे भिजवत ठेवा. यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो.

Health Tips – डेंग्यूची लागण झाल्यावर काय खावे आणि काय खावू नये?

4. कारल्याची साल काढा आणि नंतर त्यावर पीठ व मीठ लावून एक तासभर तसेच ठेवा. त्यानंतर धुवून त्याची भाजी करा.

5. कारल्याची भाजी बनवताना त्यात कांदा, बडीशेप किंवा शेंगदाने याचा वापर करा. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल.

6. कारल्याची भाजी करताना याच थोडी चिंच किंवा आमसूल टाका, यामुळेही कडूपणा कमी होतो.

Helath tips – थंडीचा मोसम येतोय, आजारांपासून वाचण्यासाठी ‘हे’ सुपरफूड खाणे आत्ताच सुरू करा

कारल्याचे फायदे –

  • कारल्यामध्ये फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. हे कफ, बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी समस्या दूर करते.
  • कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात.
  • कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.
  • रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारले अमृता सारखे आहेत. मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे.
  • हृदयाच्या विकारांसाठी कारले हे रामबाणच आहे. हे हानिकारक चरबीला हृदयाचा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ देत नाही.