गहाण ठेवलेले सोने परत मिळविण्यासाठी शेतकरी पिता-पुत्राचे उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नांदेड

शेतीकामासाठी आर्थिक अडचण असल्याने 2005 व 2006 साली एका सावकाराकडे गहाण ठेवलेले सोने उचल व नियमितपणे व्याजभरणा केल्यानंतरही परत मिळाले नाही. यामुळे हक्काचे दागिणे परत मिळविण्यासह संबधित सावकारावर कारवाई करावी या मागणीसाठी हिप्परगा येथे शेतकरी पिता-पुत्राने आमरण उपोषण सुरू केले आहे. माधवराव कदम मारोती कदम अशी या पिता पुत्राची नावे आहेत.

,नायगांव तालुक्यातील मौजे हिप्परगा (जा.) येथील कदम यांची सात एकर शेती आहे. शेतीकामासाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी 2005 व 2006 साली सावकार भानुदास मनोहर तांदळीकर यांच्या श्री.साई ज्वेलर्स दुकानात दागिणे गहाण ठेवले. ते नियमित व्याजही भरत होते. पण सावकाराकडे याचा हिशोब मागितल्यावर तो टाळाटाळ करु लागला. व गहाण ठेवलेले सोनेही त्याने परत केले नाही. यामुळे कदम यांनी 14ऑगस्ट 2017 रोजी पोलिसात याबद्दल तक्रार केली. पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. यामुळे कदम पिता पुत्राने जिल्हाधिकारी, नांदेड कार्यालयासमोर सोमवार दि.20ऑगस्ट पासून भर पावसातध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतिने जिल्हा निबंधक,सहकारी संस्था तथा सावकारांचे निबंधक,नांदेड यांना 10 ऑगस्ट 2018 रोजीच या प्रकरणात सविस्तर चौकशीसह कार्यवाहीबाबत आदेश आले होते. पण कुठलीही कारवाई कऱण्यात आली नाही. यामुळे सावकार आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप पिडीत शेतकरी पिता-पुञांनी केला आहे.

summary…for-getting back-gold-from-landers-farmer-father-and-son-protest