
सामना प्रतिनिधी । मुंबई
निवडणुकांच्या तोंडावर अनेक जण पक्ष प्रवेशासाठी इच्छुक आहेत. आपल्या स्वार्थासाठीच अन्य पक्षांतील ही नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे भाजप प्रदेश अध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
पक्ष प्रवेश करण्यामागे त्यांचा स्वार्थ असला तरी सत्तेत राहून जनतेची कामे करता येतात. सत्ताधारी पक्ष किंवा निवडणुकीत ज्या पक्षाला यश मिळते त्या दिशेने जाण्याचा कल राजकारणात नेहमीच असतो. त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी भाजपची वाट धरल्याचे चंद्रकात पाटील यांनी स्पष्ट केले. भाजप प्रवेशासाठी अनेक जण आजही उत्सुक असल्याचे ते म्हणाले.


























































