
‘फोर्ब्स’ने आपली जागतिक पॉवरफुल महिला 2025 ची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. 100 महिलांच्या पॉवरफुल यादीत हिंदुस्थाच्या तीन महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला असून त्यांना 24 वे स्थान मिळाले आहे. तर हिंदुस्थानात पहिले स्थान मिळाले आहे. एचसीएलच्या सीईओ रोशनी नाडर मल्होत्रा यांना हिंदुस्थानातून दुसरे आणि जागतिक लेवलवर 76 वे स्थान मिळाले आहे. बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार यांना हिंदुस्थानात तिसरे स्थान मिळाले असून जागतिक लेवलवर 83 वे स्थान मिळाले आहे. 100 महिलांच्या यादीत पहिले स्थान युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांना मिळाले आहे. त्या युरोपीय आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. या यादीत दुसऱया नंबरवर युरोपीय केंद्रीय बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लेगार्ड आहेत. तिसऱया स्थानावर जपानच्या नवनियुक्त पंतप्रधान सनाए ताकाइची आहे. चौथ्या स्थानावर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, पाचव्या स्थानावर मेक्सिकोच्या राष्ट्रपती क्लाउडिया शाइन बाम आहे. टॉप 10 मध्ये जनरल मोटर्सच्या सीईओ मारिया बारा आणि सीटीच्या सीईओ जेन फ्रेजर यांचा समावेश आहे.

























































