चिमुरड्याने युट्युबवर कमावले 200 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वयाच्या नवव्या वर्षी मुलं खेळतात-बागडतात, अभ्यास करतात. काही मुलं या वयात कमाई करायला सुरुवात करतात. मात्र ती कमाई फार फार तर काही रुपयांमध्ये असेल. पण रेयान काझी नावाच्या मुलाने चक्क 220 कोटी कमावले आहेत. काय ऐकून विश्वास बसत नाही ना… पण हे खरं आहे. रेयान युटय़ूबवर सर्वाधिक कमाई करणारा व्यक्ती ठरला आहे.

2020 साली युटय़ूबवर सर्वात जास्त कमाई करणाऱया लोकांची यादी फोर्ब्जने जारी केली आहे. रेयान काझी युटय़ूबवर व्हिडिओ टाकून बक्कळ कमाई करतो. फोब्जच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. वयाच्या तिसऱया वर्षांपासून रेयान युटय़ूबवर आहे. रेयान्स वर्ल्ड असे त्याच्या चॅनेलचे नाव आहे. त्याचे व्हिडिओ एवढे सुपरहिट आहेत की लाईक्स, व्हूज बघून थक्क व्हायला होतं. 2019 साली त्याने युटय़ूबवर व्हिडिओ अपलोड करून 180 कोटी रुपये कमवले होते.