चिपळूणच्या भोगाळेमध्ये मगर आढळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिपळूण शहरातील भोगाळे परिसरात रस्त्यालगत असणाऱ्या चिंतामणी कॉम्प्लेक्समध्ये बुधवारी पहाटे मोठी मगर आढळली. सोसायटीमध्ये सकाळी फुलवाला हार देण्यासाठी आला होता. त्यावेळी मगरीने अचानक जबडा उघडला. मात्र, फुलवाला सावध असल्याने तो पटकन मागे फिरला. त्यामुळे तो बचावला आहे. परिसरातील नागरिकांनी वनविभागाला संपर्क करून घटनेची माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने मगरीला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.