
अमरावतीत 5 लाखाची लाच घेताना वनविभागाच्या अधिकार्याला अटक करण्यात आली आहे. राजेंद्र बोंडे असे अधिकार्याचे नाव असून बोंडे यांनी आपल्या अधिनस्थ काम करणार्या अधिकार्यांना अतिरिक्त कार्यभार सोपविण्याच्या मोबदल्यात लाचे मागितली होती. त्यानुसार बोंडे यांना आज लाच घेताना त्यांच्या घरी अटक करण्यात आली आहे.
अमरावती येथील वनविभागात काम करणारे अधिकारी असून त्यांना वरुड जिल्हा अमरावती येथील अतिरिक्त कारभार देण्यात आला होता. त्याच्या मोबदल्यात संबंधित अधिकार्याकडे पाच लाखाची मागणी करण्यात आली होती. यानंतर तडजोड करण्यात येईल. पाच लाख रुपये दोन टप्प्यात देण्याचे ठरले. त्यानुसार आज अडीच लाखाचा टप्पा राजेंद्र गणेशराव बोंडे (विभागीय वनअधिकारी वर्ग 1, सामाजिक वनीकरण विभाग) यांना त्यांच्या निवासस्थानी व्हीनसपार्क कांतानगर येथे देण्यात आला. याच संदर्भात् संबंधित कनिष्ठ अधिकार्यांना याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई यशस्वी करण्यात आली आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.





























































