अभिनेता अरमान कोहलीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लोणावळा

प्रेयसी निरु रंधावा हिला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अभिनेता अरमान कोहलीला अटक करण्यात आली आहे. अरमान लोणावळा येथे मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपला होता. गेल्या रविवारी निरुने त्याच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरुला मारहाण केल्यानंतर अरमान फरार झाला होता. अखेर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली.

अरमान व निरु २०१५ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. त्यांच्यात पैशांवरून नेहमी वाद होत असे. गेल्या रविवारीही त्यांच्यात असाच वाद झाला. यावेळी रागाच्या भरात अरमानने निरुला बेदम मारहाण केली. त्यात तिला गंभीर इजा झाली होती. तिच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. तेव्हापासून अरमान गायब होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. यासाठी त्याच्या घरच्यांशीही पोलिसांनी संपर्क केला होता. पणअरमानबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. पण मंगळवारी त्याला लोणावळ्यातून अटक करण्यात आली आहे.