नाना असं कधी वागणार नाहीत, सेन्सॉर बोर्डाच्या माजी अध्यक्षांकडून पाठराखण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर याच्यांवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया तनुश्री दत्ता व दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यात सुरू असलेल्या वादमुळे बॉलिवूडमध्ये सरळसरळ दोन गट पडल्याचे दिसत आहे. नाना आणि तनुश्रीच्या या प्रकरणावर आतापर्यंत अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तनुश्री दत्ताला पाठिंबा दिला तर काही नाना पाटेकर यांना पाठिंबा देताना दिसत आहे. आता सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी नानांची पाठराखण केली आहे.

pahlaj-nihalani

‘टाईम्स नाऊ’ या खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुखाखतीमध्ये ते म्हणाले की, ‘हॉर्न ओके प्लीज’ हा चित्रपट 2008 चा असून त्यावेळी मी प्रोड्युसर एसोसिएशनच्या अध्यक्षपदी होतो. या चित्रपटाच्या सेटवर गोंधळ झाल्याची माहिती मला मिळाल्यावर मी तिकडे धाव घेतली होतीती. परंतु त्यावेळी नानांनी कोणतेही आक्षेपार्ह वर्तन केलं नव्हतं’.

तनुश्रीचा नवा आरोप, 2 अज्ञातांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला

ते पुढे म्हणाले की, तनुश्री तब्बल 10 वर्षानंतर नानांवर गैरवर्तवणीचा आरोप करत आहे. परंतु त्यावेळी तिने कोणतीही वाच्यता केली नव्हती. त्यावेळी खरंच काही झालं असेल तर आम्हाला सांग, आम्ही मदतीसाठी तयार आहोत, असी तिला म्हटलं होतं. परंतु त्यावेळी ती गप्प होती. आणि आताच हे आरोप का करत आहे काही कळत नाही. तनुश्री प्रसिद्ध मिळवण्यासाठी हे करत असावी, अशी शक्यता पहलाज निहलानी यांनी व्यक्त केली.

तनुश्रीची बदनामी करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे!

तसेच नाना पाटेकर हे महिलांसोबत असे असभ्य वागू शकत नाही. त्यांनी अनेक संस्थांना मदतीचा हात दिला आहे. त्यांनी कायम सामाजिक कार्यांकडे लक्ष दिलं आहे. त्यामुळे ते असं करू शकत नाही, असेही पहलानी यांनी ठासून सांगितले.