उत्तराखंडच्या माजी काँग्रेस अध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पक्षाविरोधी कारवाई केली म्हणून काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले उत्तराखंड काँग्रेसचे माजी अध्यक्ष किशोर उपाध्याय यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. काँगेसने त्यांची कालच सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली होती. मात्र हकालपट्टी झाल्या झाल्या त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, राज्य समृद्ध झाले तर राज्य आणि देशाचे संरक्षण होणार आहे. वनाधिकार हाच माझा मुख्य मुद्दा असेल आणि याबाबत मी संरक्षण खाते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा करेन, असे किशोर उपाध्याय म्हणाले.