अकरा फलंदाजच खेळवा ना!

हैदराबादविरुद्ध बंगळुरूच्या गोलंदाजांची सुमार कामगिरी पाहून माजी क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत चांगलेच चिडले आणि त्यांनी आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाला अकराच्या अकरा फलंदाज खेळविण्याचा सल्ला दिला. श्रीकांत यांनी आरसीबीच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेताना म्हणाले, लॉकी फर्ग्युसन, रीक टॉपली यांना खूप चोपले. विल जॅक्स प्रमुख गोलंदाज असूनही त्याला एकही विकेट टिपता आले नाही. तुम्हाला डय़ु प्लेसिसला 2, पॅमरून ग्रीनला 4 षटके गोलंदाजी द्यायला हवी होती. एवढेच नव्हे तर विराटलाही चार षटके गोलंदाजी करायला सांगितले असते तर त्यानेही इतक्या धावा दिल्या नसत्या.