
सामना ऑनलाईन । कोल्हापूर
कोल्हापूरचे माजी आमदार सुरेश साळोखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हेदेखील उपस्थित होते.
माजी आमदार सुरेश साळोखे यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. यापूर्वी त्यांनी मनसे कडून विधानसभा निवडणूक लढवली होती. ‘शिवसेना ही माझ्या रक्तात आहे दुसरीकडे कुठे जीव रमत नाही. आपलंच घर आहे, आपणच उभे केले आहे’, अशी प्रतिक्रिया साळोखे यांनी यावेळी बोलताना दिली.





























































