माजी खासदार धनंजय सिंह अपहरण खंडणी प्रकरणात दोषी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अपहरण आणि खंडणी प्रकरणात माजी खासदार धनंजय सिंह यांना उत्तर प्रदेशमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. धनंजय सिंह यांच्यासोबत त्यांचा सहकारी संतोष विक्रम याला देखील दोषी ठऱवण्यात आले आहे. बुधवारी या दोघांच्याही शिक्षेवर सुनावणी होणार आहे.

मुझफ्फरनगरचे नमामी गंगेचे प्रकल्प व्यवस्थापक अभिनव सिंघल यांनी 10 मे 2020 रोजी धनंजय सिंह आणि संतोष विक्रम यांच्याविरोधात खंडणी, धमकावणे आणि अपहरणाची तक्रार दाखल केली होती. संतोष विक्रम यांनी सिंघल याचे अपहरण करून त्यांना धनंजय सिंह यांच्या घरी नेले होते. त्यानंतर पिस्तुलाच्या धाकावर त्यांना मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. तसेच हलक्या दर्जाचे साहित्य पुरवण्यासाठी दबाव टाकण्यात आलेला. फिर्यादिने नकार दिल्यानंतर त्याला धमकावून खंडणी मागण्यात आली होती.

धनंजय सिंह हे सध्या लोकसभा निवडणूक लढायची तयारी करत आहे. त्यांनी नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपणच जौनपूर जिंकणार असे जाहीर केले आहे.