
कॅथेलिक चर्चचे माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले. व्हॅटिकनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोप बेनेडिक्ट यांनी आठ वर्षांहून कमी काळ पॅथेलिक चर्चचे नेतृत्व केले. त्यांनी 2013 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला. 600 वर्षांच्या इतिहासात राजीनामा देणारे ते पहिले पोप होते. त्यांच्या आधी 1415 मध्ये 12 वे पोप ग्रेगरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 2005 मध्ये पोप जॉन पॉल द्वितीय यांच्या मृत्यूनंतर पोप बेनेडिक्ट पॅथलिक चर्चेचे पोप बनले होते.
पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बेनेडिक्ट यांना श्रद्धांजली वाहिली. पोप एमेरिटस बेनेडिक्ट (सोळावे) यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांनी आपले संपूर्ण जीवन चर्च आणि मशीहाच्या शिकवणीसाठी समर्पित केले. समाजासाठी त्यांनी केलेल्या भरीव सेवेबद्दल ते स्मरणात राहतील, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले.


























































