उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थान, हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचे निधन झाले. शनिवारी त्यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

कल्याण सिंह दीर्घ काळापसून आजारी होते. त्यांच्यावर लखनौमधील एसपीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. परंतु शनिवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

कल्याण सिंह यांची प्रकृती गेल्या दोन महिन्यांपासून अत्यवस्थ होती. शनिवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यात शांती देवो, अशा शब्दात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कल्याण सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. राज्यात तीन दिवसांचा शोकही योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केला. तसेच 23 ऑगस्टला नरौरा येथील गंगा घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल, असेही योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली

दरम्यान, राम मंदिर आंदोलनामध्ये कल्याण सिंह यांचा सक्रिय सहभाग होता. अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी झालेला बाबरी मशिदीचा विध्वंसावेळी कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. कायदा सुव्यस्थेची जबाबदारी घेत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिालाहोता.

दर्शनाची इच्छा राहिली अपुर्ण

2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयावेळी कल्याण सिंह यांनी आनंद व्यक्त केला होता. अयोध्येमध्ये बनणाऱ्या भगवान श्रीराम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतरच देह ठेवणार असे ते म्हणाले होते. मात्र त्यांची ही इच्छा अपुर्ण राहिली.