
जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर वार करणाऱ्या चौघांना खडक पोलिसांनी अटक केली. ही घटना सोमवारी गंजपेठ परिसरात घडली. विनायक उर्फ नंदु सुनील शिंदे (वय 22), साहिल देवीदास पाटोळे (वय 21), उमेश मुकेश वाघमारे (वय 22), अभिजीत विनोद नाईकनवरे (वय 18, सर्व रा. गंजपेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रतीक देवकुळे (वय 20, रा. गंजपेठ) असे जखमीचे नाव आहे.
प्रतीक आणि विनायक यांची काही दिवसांपूर्वी भांडणे झाली होती. त्याच रागातून सोमवारी साथीदारांना बोलावून त्यांनी प्रतीकला मारहाण केली. त्यांच्यावर वार करून गंभीररित्या जखमी केले होते. याप्रकरणी खडक पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक राहूल जोग यांच्या पथकाने केली.























































