![Vengurle port](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/05/Vengurle-port-696x447.jpg)
वेंगुर्ले बंदर येथे गुरुवारी रात्री बुडालेली होडी आज सकाळी मूठ समुद्रात आढळली. ती मच्छीमारांनी वेंगुर्ले बंदरात आणली आहे. दरम्यान, बुडालेल्या चार खलाशांपैकी रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर(66) यांचा मृतदेह मोचेमाड समुद्रात मिळाला आहे. पोलिसांनी तो मच्छीमारांच्या सहाय्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
बेपत्ता असलेल्या मध्य प्रदेश येथील चार खलाशांपैकी तीन खलाशी अद्याप बेपत्ता त्यात आझान मुनीलाला कोल वयः 16, चांद गुलाम महम्म्द, व शिवराम कोल यांचा समावेश आहे. तर यातील चौथा रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर वयः 66 यांचा मृतदेह मोचेमाड येथे सापडला आहे.
कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध कार्य सुरू
वेंगुर्ले बंदरात बुडालेल्या खलाशांच्या शोधासाठी कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोधकार्य सुरू आहे. बंदरावर सर्व विभागांचे अधिकारी तसेच तहसीलदार ओंकार ओतारी, फिशीरीजचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित आहेत.
तीन खलाशी पोहून आल्याने बचावले
समुद्रकिनारी पोहत आलेले नंदा ठाकू हरिक्रांता(49), राजा कोल(29) व सचिन कोल हे खलाशी पोहत आल्याने बचावले आहेत. ते किनाऱयावर आले असून दुर्घटना घडल्याने भीतीच्या छायेत आहेत.