शाहीन बागेत आंदोलनादरम्यान चार महिन्याच्या बालकाचा थंडीने मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दीड महिन्यापासून दिल्लीच्या शाहीन बाग भागात CAA विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक महिला आपल्या बालकांना घेऊनच निदर्शनास बसल्यात आहेत. या दरम्यान एका चार महिन्याच्या बालकाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद जहान असे मृत मुलाचे नाव आहे.

जहान याची आई नाजिया 18 डिसेंबरपासून CAA विरोधातील आंदोलनातील सहभागी झाल्या आहेत. त्या आपल्या तीनही मुलांना घेऊन त्या आंदोलनाला हजेरी लावत. रात्री उशिरा पर्यंत आंदोलनात राहिल्याने जहानला थंडी लागली. त्याला सर्दी झाली होती तसेच नाक आणि गळ्यालाही त्रास होत होता. परंतु जहानची तब्येत इतकी बिघडेल असे आपल्याला वाटले नाही असे नाजियाने सांगितले. 31 जानेवारी रोजी जहानला इस्पितळात दाखल करण्यात आले.  डॉक्टरांनी जहानला मृत घोषित केले. असे असले तरी शवविच्छेदनाच्या अहवलात मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु जहानचा मृत्यू थंडीमुळेच झाल्याचा दावा आई नाजियाने केला आहे.